शहादा प्रतिनिधी:-श्रीम.बीनाबाई देवेन्द्र भंडारी रा.शहाणा ता.शहादा जि. नंदुरबार यांचे बिरसा मुंडा विहीर सिंचन योजनेतर्गत मंजूर विहीर यादीतून परस्पर नाव कमी करुन लाभार्थ्यांस योजनेपासून वंचित ठेवणा-या श्री. राजू पेंढारकर कृषी अधिकारी शहादा यांना तात्काळ सेवेतून निलंबित करणेबाबत लाभार्थ्यास मंजूर विहिरीचे उर्वरित रक्कम मिळावे अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार मा.माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, गटविकास अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे, यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, जगदीश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की श्रीमती बिनाबाई देवेन्द्र भंडारी मौजे शहाणा ता.शहादा जि.नंदुरबार आणि सुशिलाबाई रायसिंग डुडवे रा,शहाणा ता.शहादा जि.नंदुरबार यांचे बिरसा मुंडा सिंचन विहीर योजनेंतर्गत सन २०२१-२२ मध्ये विहीर मंजूर झाली होती. या विहीर साठी ४ लाख रूपये मिळतात परंतू अद्याप फक्त एक हप्ता रूपये ८८९४६ रूपये मिळाले आहे, उर्वरित रक्कम मिळालीच नाही. श्री राजू पेंढारकर तालुका कृषी अधिकारी यांनी कोणतीही नोटीस न पाठवता विहीर योजनेची मुदत संपली आहे. असे सागून लाभार्थीचे नाव यादीतून परस्पर कमी केले श्री राजू पेंढारकर यानी लाभार्थ्यास योजनेपासून वंचित ठेवले आहे. तरी श्रीम. बीनाबाई देवेन्द्र भंडारी रा.शहाणा ता.शहादा जि.नंदुरबार पाना बिरसा मुंडा सिंचन योजनेंतर्गत विहिरीचे उर्वरित रक्कम मिळाची त राजू पेंढारकर कृषी अधिकारी शहादा यांना लाभार्थ्यांस योजनेपासून वचित ठेवल्याप्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे. अशी विनंती कृषी अधिकारी राजू पेंढारकर यांना सेवेतून निलंबित न झाल्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी


0 Comments