अक्कलकुवा प्रतिनिधी: अक्कलकुवा- अक्राणी विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदने जाहीर पाठिंबा दिला आहे.दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी देवमोगरानगर ता.अक्कलकुवा येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तालुका शाखा अक्कलकुवा व अक्राणी तर्फे बैठक आयोजित करण्यात आली.या बैठकीत राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे तथा नंदूरबार विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रोहिदास वळवी, बिरसा फायटर्सचे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा, ॲड. रणजीत पाडवी,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, अकबर वळवी,किसन वसावे,अनिल वसावे,विलास वसावे,कैलास वसावे,विरसिंग वसावे,संजय वसावे, दिनेश वसावे, भगतसिंग वसावे, रायसिंग वसावे, सुनिल राऊत, सुनिल वसावे,बाबुराव पाडवी दशरथ वसावे,बिरबल वळवी,बिरसा फायटर्सचे धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,बिरसा फायटर्स तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,राहूल पाडवी,विलाश वसावे, रमन वसावे,कुंवरसिंग तडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
अक्कलकुवा अक्राणी विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जिल्हा शाखा नंदूरबार, तालुका शाखा अक्कलकुवा व अक्राणी तर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत. आमचे कार्यकर्ते पूर्ण ताकद निशी अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांचा प्रचार करतील व त्यांना निवडून आणण्यासाठी काम करणार आहेत.बिरसा फायटर्स संघटनेकडून नंदूरबार विधानसभा मतदारसंघात मला म्हणजेच रोहीदास वळवी अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा दिला आहे.तसाच पाठिंबा आम्ही अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना जाहीर करीत आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे रोहीदास वळवी यांनी दिली.लढेंगे और जितेंगे,भगवान बिरसा मुंडा की जय,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. सुशिलकुमार पावरा यांना सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाल्याने पक्षांच्या उमेदवारांना जोरदार धक्का लागला आहे.
0 Comments