नंदुरबार प्रतिनिधी: नंदुरबार विधानसभा मतदारसंघ निवडणूकीत बहुजन मुक्ती पार्टीचे लोकप्रिय उमेदवार रोहिदास खेमजी वळवी यांना बिरसा फायटर्स संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला आहे. बिरसा फायटर्स प्रकाशातर्फे धर्मशाळा प्रकाशा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार रोहीदास वळवी,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,नंदूरबार जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,प्रकाशा शाखेचे सल्लागार एकनाथ भील, डामरखेडाचे आकाश माळीच आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस व भाजप पक्षाचे कट्टर विरोधक, आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी,आरक्षणासाठी अहोरात्र झटणारे,आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचारांविरोधात पेटून उठणारे,पक्ष बदलू दल बदलू नेत्यांचा चांगलाच समाचार घेणारे,मणिपूर ची घटना मुद्दा असो की डिलीस्टींग चा मुद्दा असो सामाजिक विषयांवर आंदोलन करणारे आंदोलन जीवी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे कार्यकर्ते तथा बहुजन मुक्ती पार्टीचे नंदूरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार रोहिदास खेमजी वळवी यांना आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर पाठिंबा देत आहोत. मा.रोहिदास वळवी यांना निवडून आणण्यासाठी बिरसा फायटर्स टिम पूर्ण ताकद निशी निवडणूकीत उतरणार आहे.
नंदूरबार विधानसभा मतदारसंघात गेल्या ३० वर्षापासून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डाॅ.विजयकुमार गावित हे आमदार आहेत. गेली अनेक वर्षे ते मंत्री पदावर आहेत, परंतु नंदूरबार विधानसभा संघातील समस्या अद्यापही जैसे थेच आहेत. या भागातून लाखो आदिवासी बांधव दरवर्षी मजूरीसाठी गुजरात राज्यात स्थलांतर करतात, रोजगार नाही,बेरोजगार वाढला आहे, म्हणून आजही ८० टक्के आदिवासी जनता मजूरीच करते.खेडोपाड्यातील रस्ते खड्डेमय आहेत, गलिच्छ अशा वातावरणात आदिवासी बांधवांना राहावे लागते त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. पर्यटन श्रेत्रांचा विकास झाला नाही ,अशा अनेक समस्यांवर काम करणारा,लोकांच्या समस्या जाणून घेणारा ,लोकांच्या समस्या सोडवणारा प्रथमच एक लढाऊ व दमदार उमेदवार मा.रोहिदास वळवी यांच्या रूपात नंदूरबार विधानसभेत उमेदवारी करीत आहेत. त्यांना सर्वांनी सपोर्ट करावा.
नंदूरबार विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी जाहीर आवाहन करितो की,आपले अमूल्य मत हे बहुजन मुक्ती पार्टीचे लोकप्रिय उमेदवार मा.रोहिदास वळवी यांना द्याव व प्रचंड बहुनतांनी विजयी करावं. ही विनंती.जय बिरसा जय आदिवासी अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली.लढेंगे और जितेंगे, रोहीदास दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,अशा घोषणा देण्यात आल्या.
0 Comments