Advertisement

पैसे वाटप प्रकरणात शहादाचे प्रांताधिकारी सुभाष दळवी व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना निलंबित करा,सुशिलकुमार पावरा यांचे ५०२ वे उपोषण


शहादा प्रतिनिधी: नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील भोंगरा या गांवात मतदानाच्या दिवशी  मतदारांना खुलेआम पैसे वाटणा-या ,लाच देणा-या भोंगरा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री. दिनेश छोटूसिंग चव्हाण व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा व  सरपंच  पदावरून काढून टाका,तसेच जाम गांवात मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना पैसे वाटणा-या सुभाष वाघ व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करा व सदर दोन्ही प्रकरणात आरोपींना वाचविण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक चौकशी करण्यास टाळाटाळ व दिरंगाई करणा-या श्री.सुभाष दळवी 
उपविभागीय अधिकारी शहादा व श्री.शिवाजी बुधवंत, पोलीस निरीक्षक शहादा यांना सेवेतून निलंबित करा,पदावरून हटवा  या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा,अपक्ष उमेदवार, नंदूरबार लोकसभा मतदारसंघ, तथा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी आपले ५०१ वे उपोषण दिनांक ९ जुलै २०२४ रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालय समोर छेडले.लेखी पत्र मिळाल्या नंतर उपोषण मागे घेण्यात आले.
                             नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक १३ मे २०२४ रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच दिनेश छोटूसिंग चव्हाण व शांतीलाल संभू पावरा( बर्डे),कैलास बलजी भामरे,उदयसिंग फत्तेसिंग चव्हाण , इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा विडीओ वाॅटसप ग्रूपवर वायरल होत आहे.मतदारांच्या हातात २०० रूपयाच्या २ नोटा असे  ४०० रूपये  पैसे देऊन फुलवर म्हणजेच कमळावर मतदान करा, नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाहीत, कमळावरच मतदान करा,अशी धमकी सदर इसम देत आहेत.फुलावर मतदान करा असे म्हणत असल्याने सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येते .आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे,म्हणून या लोकनियुक्त सरपंचाकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमीश दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे.लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार भोंगरा येथे घडला आहे. पैसे असणारा,पैसे वाटणारा उमेदवारच हा निवडणूक लढवू शकतो,जिंकू शकतो,अशी लोकशाहीला अत्यंत धोकादायक पद्धत या लोकांनी बनवून ठेवली आहे.पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत. मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे,पैसे देणे,आमीश दाखवणे,धमकावणे हा गुन्हा आहे. लोकनियुक्त सरपंचाला असे काम करणे शोभत नाही.सदर सरपंचाने मतदारांना लाच देऊन गंभीर गुन्हा केला आहे.
               तसेच जाम या गांवात मतदानाच्या आदल्या दिवशी सुभाष वाघ व इतर व्यक्तींनी ३००-३०० रूपये वाटल्याचा विडीओची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीसाठी व  आरोपींना वाचविण्याच्या हेतूने श्री.सुभाष दळवी उपविभागीय अधिकारी शहादा  व श्री.शिवाजी बुधवंत पोलीस निरीक्षक शहादा हे दोन्ही  प्रकरणाची चौकशी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ व दिरंगाई करीत आहेत, म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करा,पदावरून हटवा,या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी उपोषण छेडले.

Post a Comment

0 Comments