Advertisement

सामाजिक कार्यकर्ता सुरजित ठाकरे यांच्यावर हल्ल्या करणा-यांवर ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करा: बिरसा फायटर्स आक्रमक

 शहादा प्रतिनिधी: सामाजिक कार्यकर्ता सुरजित कालुसिंग ठाकरे(मु.पो.फत्तेपुर ता.शहादा) यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना लवकरात-लवकर अटक करीत अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा व पोलीस निरीक्षक शहादा यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
                          सामाजिक कार्यकर्ते मा.सुरजित कालुसिंग ठाकरे हे दि.०४/०६/२०२४ रोजी रात्री १०:००ते ११:०० च्या दरम्यान म्हसावदहुन आपल्या घरी फत्तेपूर येथे मोटार सायकलने जात असताना तीन-चार लोकांना प्राणघाती हल्ला केला यात आदिवासी मातले आहे असे बोलत मारहाण करायला सुरुवात केली त्यांच्या तावडीतून कशी तरी सुटका करीत सुरजित ठाकरे यांनी म्हसावद पोलिस स्टेशन गाठले त्यांनंतर त्यांना,छातींत जास्त त्रास होत असल्याने पोलिसांकडून पुढील उपचारा करीता पहाटे ३:३० ते ४:३० च्या दरम्यान शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्या नंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तरी संबंधित हल्लेखोर पैकी सलमान पठाण,नाविद पठाण यांची ओळख पटली असुन त्यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित होते मात्र आज पर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही यांच्या उलट सुरजित कालुसिंग ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे,एका सामाजिक कार्यकर्त्यावर अश्या प्रकारे हल्ला होत त्यांच्यावरंच गुन्हे दाखल करणे आणि गुन्हेगारांना अभय देणे हा चिंतेचा विषय आहे,तरी संबंधित हल्लेखोरांना लवकरात-लवकर अटक करीत त्यांच्यावर अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा समस्त आदिवासी समाजाकडून आंदोलन करण्यात येईल यांची प्रशासनांने नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments