Advertisement

वडेगांव ता साकोली ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच वामन विठोबा कापगते वयोवॄध्रद( निवर्तले) काळाच्या पदड्याआड ग्रां पं वडेगांव तर्फे भावपुर्ण श्रध्दाजंली🌹🌸💐 *

साकोली; (वडेगांव २३  :जुन ) येथील माजी उपसरपंच व माजी सेवा सह सदस्य वामन विठोबाजी कापगते हे आज त्यांचेच निवास्थानी दुपारी १ वाजे दरम्यान मरण पावले त्यांची मरणाची बातमी ऐकताच सर्वत्र कुटुंब आप्तेष्ठ,इष्टमित्र मंडळीनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांचे जाने आपसुक असले व मॄत्य मानसाचा अंतिम मित्र सोबती असला जरी ते  येणार हे सत्य. ते कर्तव्यदक्ष नागरिक म्हणुन  अोळख होती. त्यांचा मोठा परिवार असून त्यांचे मागे पश्च्यात भाऊ,त्यांचे मुले व नातु पड नातु असा भला वॄक्षासमान परिवार आहे ते श्रीयुक्त संजय कापगते सदस्य ग्रां पं यांचे वडील आहेत गावाच्या न्याय व विकसनशील कार्यात ते सदा पुढे होते त्यांचे निघुन जाने सुखद धक्का आहे कारण त्यांचे मॄत्यु समयी ते ९० वर्षाचे असतील जीवनात कुठलाही अंपंगत्व आले नाही व कुणालाही त्यांचेकडून परिवाराला त्रास नव्हता असी व्यक्ती इतरांच्या मनावर राज करणारी होती ते सर्व परिचित होते यामुळे गावात व नातेवाईक यांना तसा अंतिम समयी जीवन जगण्याचा सल्ला देवून गेला.त्याची अंतिम यात्रा कपुरा नाला येथे उदया सकाळी ९ वाजे निघेल असी नातवाईक यांना संदेश दिला असून त्यांचे परिवारास दुख शहन करण्याचे साहस परमात्मा देईल असी आशा करतो व अशा महान व्यक्तीला अंतिम समयी सद्गती प्राप्त होवो.आपले परिवार सुध्दा आपल्या दुखात सामिल आहे असी भावपुर्ण श्रध्दाजंली वाहतो असे भेटी अंती डाँ सुरेशकुमार पंधरे राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच वडेगांव यानी शोकसंवेदना प्रकट केली आहे .

Post a Comment

0 Comments