Advertisement

पोस्टल मतदानात अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांची आघाडी

सरकारी कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क 

शहादा : सर,आम्ही पोस्टल मतदान तुम्हाला केले आहे.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.आमच्या कुटुंबांतील लोकांनाही तुम्हाला मतदान करायला आम्ही सांगत आहोत, असे म्हणत विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या सरकारी कर्मचाऱ्यांनी अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा दर्शविला आहे.नंदूरबार,धुळे जिल्ह्य़ासह जळगाव,रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा,सांगली,पुणे इत्यादी सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सुशिलकुमार पावरा यांना पोस्टल द्वारे मतदान केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार हे अपक्ष निवडणूक लढवित आहेत.सुशिलकुमार पावरा यांना ६४ पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.मराठा समाजातील लोकांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
                        मी स्वतः शिक्षक आहे,सरकारी कर्मचारी आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय पुढारी किती त्रास देतात व जाणीवपूर्वक टार्गेट करतात, हे मी स्वतःच अनुभवले आहे.दुस-या जिल्ह्य़ात जाऊन नोकरी करणे किती त्रासदायक होते,हेही बघितले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांची नोकर भरती करणे,प्राध्यापक भरती करणे,जुनी पेन्शन योजना लागू करणे,वारसदारांना अनुकंपा वर नोकरीला लावणे,पगार वाढ करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय याबाबत मी स्वतःच काम केले आहे.त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के मतदान मला मिळेल, अशी मला खात्री आहे,सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मी जाहीर आवाहन करितो की,आपण सगळ्यांनीच पोस्टल द्वारे मतदान करावे,ही विनंती,मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.तुमचे एक एक मत सुद्धा खूप किंमती आहे,तुमचे पोस्टल मतदान हे संपूर्ण निकाल बदलू शकते,म्हणून मतदान करा. ज्यांनी मला मतदान केले आहे ,त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे. असे जाहीर आभार बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी मानले आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पहिले पोस्टल मतदान मिळाले असून ८० टक्के पेक्षा अधिक मतदान सुशिलकुमार पावरा यांना होत असल्यामुळे नंदूरबार लोकसभा निवडणूक सुशिलकुमार पावरा हेच जिंकतील असे भविष्य वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments