Advertisement

शहरी भागापेक्षा खेडेगांवातील मते अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना अधिक मिळतील, लोकांचा अंदाज.

शहादा (प्रतिनिधी) :नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना शहरी भागापेक्षा खेडेगावातील मते अधिक मिळतील, असा लोक अंदाज व्यक्त करू लागले आहेत. सुशिलकुमार पावरा हे आपल्या बिरसा फाइटर्स कार्यकर्त्यांसोबत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील ८ तालुक्यात झंझावाती दौरे करत आहेत. शहरी भागासोबतच दुर्गम भागातही दौरे करत आहेत. सुशिलकुमार पावरा यांना शहादा ,शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा,साक्री ,नवापूर,तळोदा ,नंदुरबार अशा ८ तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. 
                       सुशिलकुमार पावरा यांना ६४ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा मिळाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.साखर कारखाना कामगार व शेतक-यांनीही पाठिंबा दिला आहे.स्थलांतरित मजूरांनीही आम्ही सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार, असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना विविध समाजातील लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे.पक्षांच्या नेत्यांना कंटाळून पक्षांच्या उमेदवारांपेक्षा सुशिलकुमार पावरा यांना अधिक पसंती मिळत आहे.काँग्रेस व भाजप व इतर पक्षांतील सरपंचांनीही सुशिलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दाखविला आहे.नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात काँग्रेसचे गोवाल पाडवी, बिरसा फायटर्सचे अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा व भाजपच्या हिना गावीत यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments