Advertisement

मतदारांना पैसे वाटप प्रकरणात जामचे भाजपचे नकली सरपंच सुभाष वाघ विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

भाजप विरुद्ध बिरसा फायटर्स सामना सुरूच

शहादा प्रतिनिधी: नंदूरबार लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी खुलेआम पैसे वाटणा-या भोंगरा येथील सरपंच व इतर व्यक्तींविरुद्ध तक्रारीच्या अनुषंगाने श्री.सुभाष शिवाजी वाघ राहणार- जाम ता.शहादा हे मला जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याबाबत सुभाष वाघ यांच्यावर गुन्हा नोंद करून अटक करा,अशी तक्रार सुशिलकुमार पावरा अपक्ष उमेदवार तथा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांच्याकडे दाखल केली आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी दिनांक १३ मे २०२४ रोजी मतदारांना खुलेआम पैसे वाटणा-या भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करणेबाबत, असा तक्रार अर्ज दिनांक १८/०५/२०२४ रोजी मा.पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे शहादा व भोंगरा येथील सरपंचाला सरपंच पदावरून काढून टाकणेबाबत, दिनांक २८/०५/२०२४ रोजी मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
                      या तक्रारीच्या अनुषंगाने श्री.सुभाष शिवाजी वाघ राहणार जाम ता.शहादा हे आमच्या बिरसा फायटर्स संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे यांना आज दिनांक २९/०६/२०२४ रोजी फोन करून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.तसे मला गणेश खर्डे यांनी फोन करून सांगितले आहे.संभाषणातील त्यांनी दिलेली धमकीचा मजकूर असा की,काल परवा बिडीओना विषय देऊन काय विषय सुरू आहे,मी काय सांगतो,उपोषणाला बसू द्या,त्याचे त्याला करू द्या.सुशिलकुमार पावरा यांना एवढं सांगा.आम्ही आदिवासी जात दाखवू, आदिवासी सरपंच संघटना त्याला कुत्र्यासारखे मारतील, हे ऐकून घे.हे मजाकमध्ये विषय घेऊ नको.सांग त्याला मोठे मॅटर होऊन जाईल. तुला काय वाटते,कितीक जणांना आम्ही मारले आहे.आम्ही आदिवासी सरपंच संघटनेचे ४०-५० सरपंच एकत्र होऊ ना.विषय कुठे च्या कुठे वाढेल. त्याला हा विषय मजाकमध्ये घेऊ नको सांग. आम्ही कधी उठलो बिठलो तर विषय कुठेन कुठे वाढून जाईल. त्याला सांग.गोपाल फोन रिसिव्ह करत नाही.गोपाल लाही सांग ,विषय वाढवू नको.बदनामीचा विषय गावाचे राजकारण. गांवा पुरता राहू द्या .तुम्ही मध्ये पडले तर जड पडेल तो.सुशिलकुमार पावरा कुठे फसेल सांग. पंचायत समितीत राडा करू आम्ही.त्याला फक्त उपोषणाला बसू दे. बघून घे आम्ही कुठच्या कुठे मॅटर करून टाकू. कोणत्याही सरपंचाच्या ठिकाणी मी उभा असतो.त्याला कानावर टाक. सुशिलकुमार पावरा हा जास्त ईमानदारीमध्ये राहतो.त्याला सांग.कुठून कुठे लफडी होईल. सगळे सरपंच माझ्या सांगण्याची वाट बघतात. आम्ही एकजूठीने ४०-५०-७० सरपंच एकत्र करून घेवू.विषय आणीबाणी आला तर कुठेही विषय होईल. असे मतांसाठी पैसे वाटणे राजकारण मध्ये चालते.आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही,कोणतीही कारवाई होत नाही,अशी धमकी दिली.महोदय, या प्रकरणाच्या अनुषंगाने मला धमकी ,दमदाटी करून दबाव आणला जात आहे.तरी सुभाष शिवाजी वाघ राहणार जाम या व्यक्तींविरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करून अटक करावी.अशी मागणी करण्यात आली आहे.चौकशी केली असता सुभाष वाघ हा जाम ग्रामपंचायतचा सरपंच नसल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे.त्यामुळे नकली सरपंच ग्रामपंचायतचा कारभार चालवतात का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments