Advertisement

अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करून पेट्रोल टाकून जिवंत जाळणा-या आरोपींना फाशी द्या- बिरसा फायटर्सची मागणी

शहादा प्रतिनिधी: अल्पवयीन मूकबधिर आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिच्या पेट्रोल टाकून जिवंत जाळणा-या आरोपींना अटक करून फाशी द्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी,राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भील प्रदेश मोर्चाचे प्रचारक डाॅ.सतीश पाडवी, सोबत काही कार्यकर्ते उपस्थित होते.
                            राजस्थान मध्ये करौली जिल्ह्यात हिडौन येथे एका मुक बधिर अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करून तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची घटना घडली आहे.मानवतेला कलंकित करणारी ही घटना घडली आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.जखमी अवस्थेत मुलीला जयपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दहा दिवस उपचार सुरू असतानाच्या दरम्यान मुलीला दूर्दैवी मृत्यू झाला.आरोपीत नराधामांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एस आय टी स्थापन करण्यात यावी व प्रकरणाची जलद गतीने तपास करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments