Advertisement

कॉंग्रेसचे गोवाल पाडवीला मतदान करू नका,३५ वर्षे आमदार बापासारखा नंदूरबार जिल्ह्य़ातून मुंबईला गायब होईल- सुशिलकुमार पावरा

शहादा- नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजप पक्षात घराणेशाही सुरू आहे.काहीही ओळख नसताना व सामाजिक कार्य शून्य असताना केवळ बाप काँग्रेसचा आमदार होता म्हणून के.सी.पाडवीचा मुलगा गोवाल पाडवी याला काँग्रेस पक्षाने टिकीट दिले आहे.के.सी.पाडवी ३५ वर्षे अक्राणी व अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार आहेत, नंदूरबार जिल्ह्य़ात राहत नाहीत, निवडले की मुंबईला गायब होतात, ३५ वर्षे मुंबईला गायब झाले.आता त्यांचा मुलगा जर निवडला तर तो सुद्धा बापासारखा मुंबईला गायब होईल, म्हणून आपले मत वाया घालवू नका,काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवीला मतदान करू नका,अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना मतदान करा,असे आवाहन अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी जनतेला केले आहे.भाजप सुद्धा आदिवासी विरोधी धोरण वापरत आहे.म्हणून भाजपचे उमेदवार हिना गावित यांनाही मतदान करू नका.
                      नंदूरबार जिल्ह्य़ातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे.अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो.जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत. तालुकानुसार विचार केला तर धडगांव हून चूलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता ,माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार के सी पाडवी यांच्या असली या गावाकडे ,अस्तंभा कडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे.रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत.अजूनही गर्भवती महिलांना झोलीत नेऊन दवाखान्यात पोहचवावे लागते.काँग्रेस व भाजप नेत्यांनी नंदूरबार जिल्ह्य़ातील जनतेला खाल्ले आहे.विकास अजिबात केला नाही.समस्या जैसे थेच आहेत. ७६ वर्षे काँग्रेस व भाजप उमेदवारांना जनता संधी देत आली आहे,आता नवीन अपक्ष उमेदवाराला संधी द्यावी.
                      रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे,तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे.खड्डे चूकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाडयांचेही प्रचंड नुकसान होत आहे.या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत. हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे.या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी बिरसा फायटर्स धडगाव शाखेने घंटानाद आंदोलनही केले होते.स्वत: श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवले. तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे ३५-४० वर्षे आमदार राहून के.सी.पाडवी यांनी स्वतःच्या गावाचा रस्ता बनवला नाही ,बाप काय करत होता? म्हणून के.सी.पाडवीच्या मुलाला काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवीला आम्ही मतदान करणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया कालीबेल येथील नागरिकांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments