Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना शबरी माता भिल्ल आदिवासी विकास संघटना,आदिवासी शक्ती सेना,आदिवासी रावण किंग फाऊंडेशन व महादेव कोळी संघटनेचाही पाठिंबा

६४ संघटनांचा पाठिंबा नंदूरबारचा निकाल बदलणार?

शहादा :नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संघटना,आदिवासी शक्ती सेना ,आदिवासी रावण किंग फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संघटना व महादेव कोळी संघटना अशा आणखीन ४ संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.शबरीमाता भिल्ल आदिवासी विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक बर्डे यांनी सुशिलकुमार पावरा यांना फोन करून आपल्या संघटनेचा पाठिंबा असल्याचे सांगितले आहे.तसेच आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अर्जुन भाऊ गांगुर्डे यांनी आदिवासी रावण किंग फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेचाही पाठिंबा असल्याचे वाॅटसप ग्रूपवर जाहीर केले आहे.त्यानंतर महादेव कोळी संघटनेचे कैलास शार्दूल यांनीही पाठिंबा दर्शविला आहे.त्यामुळे सुशिलकुमार पावरा अपक्ष उमेदवार यांना पाठिंबा देणा-या संघटनांची एकूण संख्या ६४ झाली आहे.ह्या संघटना नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा निकाल बदलतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.सुशिलकुमार पावरा यांना शहादा ,शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा,साक्री ,नवापूर,तळोदा ,नंदुरबार अशा ८ तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे. 
                       सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.मुस्लिम बांधवांचाही पाठिंबा मिळाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.साखर कारखाना कामगार व शेतक-यांनीही पाठिंबा दिला आहे.स्थलांतरित मजूरांनीही आम्ही सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार, असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना विविध समाजातील लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे.पक्षांच्या नेत्यांना कंटाळून पक्षांच्या उमेदवारांपेक्षा सुशिलकुमार पावरा यांना अधिक पसंती मिळत आहे.काँग्रेस व भाजप व इतर पक्षांतील सरपंचांनीही सुशिलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दाखविला आहे.त्यामुळे पक्ष व अपक्षांच्या मदतीने नंदूरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०० टक्के जिंकून नंदूरबार लोकसभेचा निकाल बदलतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments