Advertisement

बिरसा फायटर्सच्या ३५८ व्या शाखेचे उद्घाटन

तळोदा:१४ एप्रिल २०२४ रोजी बीलीचीपाडा येथे बिरसा फायटर्सच्या ३५८ व्या शाखेचे उद्घाटन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,ध्वजापाणी गाव अध्यक्ष डोंगरसिंग पावरा, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.गांव अध्यक्षपदी वनसिंग पटले यांची निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष पदी किसन वसावे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सचिव बंडा पटले ,कार्याध्यक्ष जयराम पटले,कोषाध्यक्ष जयसिंग वसावे,सहसचिव सुनिल पटले,महिला प्रतिनिधी कुंदाबाई पटले,संघटक जयसिंग वळवी,प्रसिद्धीप्रमुख माधव वसावे,सल्लागार गमा तडवी,सदस्य गवश्या भिल ,सुभाष वसावे ,विलास पटले,गुलाबसिंग पटले यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,अशा शुभेच्छा सुभाष पावरा,तालुकाध्यक्ष तालुका शाखा तळोदा जिल्हा नंदूरबार यांनी दिल्या आहेत. भगवान बिरसा मुंडा की जय,विर एकलव्य की जय,क्रांतीवीर खाज्या नाईक की जय,लढेंगे और जितेंगे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments