Advertisement

गणोर येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली


घटनेने देशाच्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून आपण ते बजावलेच पाहिजे, या विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी  जिल्हा परिषद मराठी शाळा गणोर येथे मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली.  विद्यार्थ्यांनी हातात सूचना फलक घेऊन 'मतदान करा' मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा दिल्या. विद्यार्थी स्काऊट व शालेय गणवेशात उपस्थित होते.  आवाजाने व मतदान करा या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या जनजागृतीच्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल रावताळे,चेतन पाटील , मनोहर निमजे , गुलाब पावरा,प्रकाश जाधव भोमराज, जाधव, दामू वळवी अंगणवाडी सेविकां योगिता भामरे,सर्व शालेय पदाधिकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्यने परिसरातील नागरिकांनी मतदान करा या अभियानास उत्तम प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments