Advertisement

पक्ष उमेदवारांवर अपक्ष उमेदवार भारी!


अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील गावांचाही सुशिलकुमार पावरा यांना जोरदार पाठिंबा

शहादा : नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत.त्यासाठी अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे आपल्या बिरसा फाइटर्स कार्यकर्त्यांसोबत नंदूरबार लोकसभा मतदारसंघातील ८ तालुक्यातील गांव दौरा सुरू केला आहे.शहादा,शिरपूर तालुक्यानंतर अक्राणी व अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गांवांचा सुशिलकुमार पावरा यांना जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे.गौ-या,चुलवड, राडीकलम, मनवाणी,केला,मोलगी,काठी,मालपाडा, धनाजे व इतर अनेक गांवांचा यात समावेश आहे.सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.मराठा समाजाच्या लोकांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्या पाठोपाठ विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही सुशिलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दिला आहे.त्यामुळे काँग्रेस व भाजप पक्षाच्या गटात हडकंप माजले आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत, भाजप व इतर पक्षांतील कार्यकर्तेही सुशिलकुमार पावरा यांचे खुले समर्थन करत आहेत. काही कार्यकर्ते छुपा पाठिंबा देत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनीही आम्ही पोस्टल मतदान फक्त सुशिलकुमार पावरा यांनाच करणार आहोत, म्हणत पाठिंबा देत आहेत.
                    अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना दिवसेंदिवस गावांचा मिळणारा वाढता पाठिंबा,पसंती बघता काँग्रेस व भाजप पक्षांच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा भारीच पडतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे.कारण असे खुले समर्थन भाजपचे उमेदवार हिना गावित व काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व इतर कोणत्याच उमेदवारांना मिळतांना दिसत नाही.तरूण मंडळी नंदूरबार लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निकाल सुशिलकुमार पावरा यांच्या तिस-या पर्यायाच्या रूपाने बदलतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments