Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना ६ तालुक्यांचा पाठिंबा;२ तालुके दौरे बाकी

पक्षांच्या उमेदवारांपॆक्षा अपक्ष उमेदवाराला पसंती

शहादा :नंदूरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना शहादा,शिरपूर, धडगांव, अक्कलकुवा,साक्री ,नवापूर अशा ६ 
तालुक्यातील अनेक गांवांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे.तळोदा व नंदुरबार असे २ तालुक्याचे दौरे बाकी आहेत. काँग्रेस पक्षाचे नवापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिरीषदादा नाईक यांची बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व त्यांची २० बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली. सुशिलकुमार पावरा यांना नंदूरबार लोकसभा निवडूक जिंकण्यासाठी शुभेच्छा मिळाल्या.नंदूरबार लोकसभाश्रॆत्रातील पक्षांच्या एक -दोन मोठ्या नेत्यांचा पाठिंबा मिळाल्यानंतर अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०० टक्के नंदूरबार लोकसभेची निवडणूक जिंकतील, असे तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. 
                       सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे.विद्यार्थी व शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला.मराठा समाजाचाही पाठिंबा मिळाला आहे.सर,आमचे पोस्टल मतदान तुम्हालाच, असे म्हणत सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करणार, असा ठाम निर्धार चूलवड ग्रामस्थांनी केला आहे.साखर कारखाना कामगार व शेतक-यांनीही पाठिंबा दिला आहे.स्थलांतरित मजूरांनीही आम्ही सुशिलकुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार, असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पक्षांच्या उमेदवारांपेक्षा अधिक पसंती मिळत आहे.त्यामुळे नंदूरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा हे १०० टक्के जिंकतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments