Advertisement

सर,आमचे पोस्टल मतदान तुम्हाला!सरकारी कर्मचाऱ्यांचाही अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा

शहादा : सर,आम्ही पोस्टल मतदानासाठी फाॅर्म घेऊन ठेवला आहे,आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत. तुम्ही बिनधास्त लढा.आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.आमच्या कुटुंबांतील लोकांनाही तुम्हाला मतदान करायला आम्ही सांगत आहोत, असे म्हणत विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या सरकारी कर्मचाऱ्यांनी अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा दर्शविला आहे.नंदूरबार जिल्ह्य़ासह
रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा,सांगली,पुणे इत्यादी सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सुशिलकुमार पावरा यांना पोस्टल द्वारे मतदान करणार असल्याचे फोनवर बोलून दाखवले आहे.नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत.सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दिला आहे.मराठा समाजातील लोकांनीही पाठिंबा दर्शविला आहे.
                        मी स्वतः शिक्षक आहे,सरकारी कर्मचारी आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय पुढारी किती त्रास देतात व जाणीवपूर्वक टार्गेट करतात, हे मी स्वतःच अनुभवले आहे.दुस-या जिल्ह्य़ात जाऊन नोकरी करणे किती त्रासदायक होते,हेही बघितले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांची नोकर भरती करणे,प्राध्यापक भरती करणे,जुनी पेन्शन योजना लागू करणे,वारसदारांना अनुकंपा वर नोकरीला लावणे,पगार वाढ करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय याबाबत मी स्वतःच काम केले आहे.त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के मतदान मला मिळेल, अशी मला खात्री आहे,सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मी जाहीर आवाहन करितो की,आपण सगळ्यांनीच पोस्टल द्वारे मतदान करावे,ही विनंती,मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे.तुमचे एक एक मत सुद्धा खूप किंमती आहे,तुमचे पोस्टल मतदान हे संपूर्ण निकाल बदलू शकते,म्हणून मतदान करा. असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना असा दिवसेंदिवस मिळणारा पाठिंबा बघता नंदूरबार लोकसभा निवडणूक सुशिलकुमार पावरा हेच जिंकतील असे भविष्य वर्तविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments