Advertisement

सरकारी डाॅक्टर फक्त १० मिनिट रूग्णालयात थांबतात व महिन्याचा पगार घेतात, कामावरून काढून टाका,बिरसा फायटर्स आक्रमक


*डाॅ.अनिल जटाल विरोधात मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तक्रार* 

नंदूरबार:डाॅ.अनिल जटाल, वैद्यकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदूरबार व जिल्हा रूग्णालय नंदूरबार यांना सेवेतून काढून टाका व त्यांच्या बद्दलच्या अनेक तक्रारींवर कारवाई करावी ,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करण सुळे,धनायुष भंडारी,पवन सुळे,रमेश पटले,रवींद्र नावडे,भावसार मोते, चिका भोसले, धना ठाकरे,रायमल पवार, करण पटले,भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा,शशिकांत पावरा,दिलवरसिंग पाडवी,हारसिंग भील, फेंदा वळवी,फुलसिंग वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                     डाॅक्टर अनिल जटाल वैद्यकीय अधिकारी यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदूरबार व जिल्हा रूग्णालय नंदूरबार येथे नियुक्ती असून सदर डाॅक्टर हे रूग्णालयात महिन्यातून फक्त १० दिवस हजर राहतात. त्यातल्या त्यात रूग्णालयात फक्त १० मिनिटे थांबतात. व इतर वेळेस दोंडाईचा, शहादा,खेतिया,पानसेमल अशा त्यांच्या खाजगी दवाखान्यात चालले जातात. त्यामुळे रूग्णांना पूर्ण पणे सेवा मिळत नाही. बायोमेट्रिक हजेरीवर सुद्धा फक्त १० दिवस अंगठा लावून हजर राहतात,इतर २० दिवस गैरहजर राहतात. त्यांचा पूर्ण महिन्याचा पगार कशा आधारे काढला जातो? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच कान,नाक,घसाचे खोटे प्रमाणपत्र देतात, सरकारी रूग्णालयात ऑपरेशन साठी आलेल्या रूग्णांना त्यांच्या खाजगी दवाखान्यात रेफर करून ४० हजार रूपये घेतात. म्हणून डाॅक्टर अनिल जटाल हे महिन्यातून फक्त १० दिवस रूग्णालयात येऊन १० मिनिटे थांबतात, रूग्णांना पूर्ण पणे सेवा देत नाहीत ,खोटे प्रमाणपत्र देतात, ऑपरेशन साठी खाजगी दवाखान्यात पाठवून ४० हजार रूपये घेतात,३० पैकी फक्त १० दिवस बायोमेट्रिक हजेरीवर अंगठा लावून पूर्ण महिन्याचा पगार घेतात,अशा अनेक तक्रारी आहेत. तरी याची सखोल चौकशी करून डाॅक्टर अनिल जटील यांना सेवेतून काढून टाकावे,हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदूरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments