Advertisement

अपक्ष उमेदवार जोमात;पक्ष उमेदवार कोमात

शिरपूर तालुक्यातील गावांचाही सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा

शहादा : नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत.सुशिलकुमार पावरा यांना ५८ पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.मराठा समाजाच्या लोकांनीही पाठिंबा दर्शविला आहे. त्या पाठोपाठ विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही सुशिलकुमार पावरा यांना खुला पाठिंबा दिला आहे.शहादा तालुक्यातील गावोच्या गांवी पाठिंबा मिळाला आहे.शिरपूर तालुक्यातील गांवाचाही जोरदार पाठिंबा सुशिलकुमार पावरा यांना मिळत आहे.त्यामुळे काँग्रेस व भाजप पक्षाच्या उमेदवारांना धडकी निर्माण झाली आहे. शहादा तालुक्यानंतर सुशिलकुमार पावरा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिरपूर तालुका दौरा सुरू केला आहे.मालकातर, गोदडदेव, बोराडी,नवागाव, इत्यादी गावांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे.पक्ष उमेदवारांवर नाराज असलेल्या मतदारांनी अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांच्यावर विश्वास दाखवत पूर्ण पणे पाठिंबा देत आहेत.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी गावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत, भाजप व इतर पक्षांतील कार्यकर्तेही सुशिलकुमार पावरा यांचे खुले समर्थन करत आहेत. काही कार्यकर्ते छुपा पाठिंबा देत आहेत.
                    अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना दिवसेंदिवस गावांचा मिळणारा वाढता पाठिंबा,पसंती बघता काँग्रेस व भाजप पक्षाच्या उमेदवारांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.कारण असे खुले समर्थन भाजपचे उमेदवार हिना गावित व काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व इतर कोणत्याच उमेदवारांनाही मिळत नाही.फक्त अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा देण्यासाठी गावोच्या गावी जनता पुढे येत आहे.त्यामुळे अपक्ष उमेदवारामुळे पक्षांच्या मतांचे गणित पूर्ण पणे बिघडले आहे.कारण पक्षांतील उमेदवारांना नाराज गटाचा पक्षांतर्गतच वाढता विरोध सुरू आहे.उलट काँग्रेस सोबत भाजप व इतर पक्षांतील कार्यकर्ते सुशिलकुमार पावरा यांना खुले समर्थन देत आहेत. त्यामुळे पक्षांचे उमेदवार कोमात व अपक्ष उमेदवार जोमात असे चित्र नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments