Advertisement

विद्यार्थी व शिक्षक मिळून जिंकणार नंदूरबार लोकसभा

विद्यार्थी संघटनाही सुशिलकुमार पावरा यांच्या समर्थनार्थ

शहादा : नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत.सुशिलकुमार पावरा यांना ५६ पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.आता ऑल इंडिया स्टूडन्ट फेडरेशननेही समर्थन दर्शवले आहे.सुशिलकुमार पावरा हे स्वतः शिक्षक आहेत. त्यांच्या समर्थनार्थ विद्यार्थीही उतरले आहेत.बिरसा फायटर्सचे प्रभावी काम बघून विद्यार्थांनी स्वतःच सुशिलकुमार पावरा यांच्याशी संपर्क साधला.सुशिलकुमार पावरा व विद्यार्थी संघटना पदाधिकारी यांची अर्धा ते एक तास शहादा येथे हितगुज झाली.या चर्चेत ऑल इंडिया स्टूडन्ट फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग, राज्य सचिव वैभव चोपकर, प्राजक्ता कापडणे,जिल्हाध्यक्ष माधव पावरा,जिल्हा सचिव छोटूलाल पावरा,गोविंद पावरा आदि विद्यार्थी सहभागी झाले.
                        नंदूरबार जिल्ह्य़ात आदिवासी भागातील खेडोपाड्यात जाऊन लोकांना शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचे काम ऑल इंडिया स्टूडन्ट फेडरेशन- विद्यार्थी संघटना करीत आहे.या संघटनेचे समर्थन मिळणे हे माझे भाग्य आहे.विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून माझा आत्मविश्वास आणखीनच वाढला आहे.विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य आहे.भविष्यात कोणाची सत्ता पाहिजे ,कोणाची नको,हे ठरवण्याची ताकद विद्यार्थ्यांत आहे.आजपर्यंत जी सामाजिक व राजकीय क्रांती केली आहे,ती विद्यार्थी संघटनांनी केली आहे.विद्यार्थी व शिक्षक मिळून आम्ही ही नंदुरबार लोकसभेची निवडणूक नक्कीच जिंकू,असा विश्वास सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केला आहे.मराठा समाजानेही सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा दर्शविला आहे. अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी गावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत, भाजप व इतर पक्षांतील कार्यकर्तेही सुशिलकुमार पावरा यांना खुला व छुपा पाठिंबा देत आहेत.त्यामुळे नंदूरबारात भाजपच्या उमेदवार हिना गावित व काँग्रेस चे उमेदवार गोवाल पाडवी यांना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे अपक्ष उमेदवार भारी पडतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments