Advertisement

मराठा संघाचाही पाठिंबा,सुशिलकुमार पावरा यांची नंदूरबार लोकसभा विजयाकडे वाटचाल..

अब तक ५६ संघटनांचा पाठिंबा,कामगार, शेतकरी,गांव ग्रूपचे समर्थन!

शहादा : नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत.सुशिलकुमार पावरा यांना ५० पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.आता मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सर,आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे. या सोबत कामगार संघटना महाराष्ट्र, शेतकरी संघटना महाराष्ट्र व तेलखेडी गावातील मित्र परिवार ग्रूपनेही फोन करून पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सुशिलकुमार पावरा यांना पाठिंबा देणा-या संघटनांची संख्या ५६ झाली आहे.अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांनी गावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत.काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत, भाजप व इतर पक्षांतील कार्यकर्तेही सुशिलकुमार पावरा यांचे खुले समर्थन करत आहेत. काही कार्यकर्ते छुपा पाठिंबा देत आहेत.
                    अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना वाढता पाठिंबा,पसंती बघता काँग्रेस व भाजप पक्षातीलच नाराज गटाचा वाढता विरोध, काँग्रेस सोबत भाजप व इतर पक्षांतील कार्यकर्त्यांकडून सुशिलकुमार पावरा यांना समर्थन मिळत आहे.त्यामुळे नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजप कडून म्हणजेच महायुतीकडून हिना गावित यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.हिना गावित यांना टक्कर देईल असा उमेदवार काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात येईल, अशी आशा होती.परंतु काँग्रेसने उमेदवार घोषित केल्यानंतर भाजप गटाकडून हिना गावित ची जीत पक्की असा विजयी जल्लोष केला.कारण हा गोवाल पाडवी कोण ? असे प्रश्न काँग्रेस कार्यकर्तेच विचारू लागले. त्यामुळे काँग्रेसने गोवाल पाडवीला उमेदवारी देऊन फार मोठी चूक केली आहे,अशी प्रतिक्रिया वाॅटसप वर लोक देऊ लागले आहेत.परंतू अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा यांना संघटनांचा व जनतेचा वाढता पाठिंबा बघता जनतेला विजयाची आशा निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढणा-या पाठिंब्यामुळे सुशिलकुमार पावरा यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments