Advertisement

रांजणगाव गणपती येथे जि.प.शाळेत शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भेट दिली

शनिवार दिनांक 23 /03/2024 रोजी सकाळी दहा वाजता माननीय श्री. संजय नाईकडे साहेब जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पुणे यांनी शेळकेवस्ती (रांजणगाव गणपती) ता. शिरुर .जी.पुणे शेळके वस्ती येथील शाळेस अचानक भेट दिली .पहिली ते चौथीचे वर्ग पहाणी, शालेय परिसर स्वच्छता पाहणी ,ऑफिस रेकॉर्ड व मुलांशी संवाद साधला. मुलांनी दिलेली उत्तरे ऐकून सुंदर स्वच्छ परिसर व बोलक्या भिंती पाहून माननीय श्री. संजय नाईकडे साहेब शिक्षणाधिकारी पुणे खुष झाले. स्वतःचा सन्मान न करून घेता माननीय मुख्याध्यापक सौ. संगीता जगताप यांचा सन्मान स्वहस्ते करून चांगल्या कामाचे बक्षीस दिले व भविष्यात चांगल्या कामास प्रेरणा. यावर मुख्याध्यापिका. संगीता जगताप म्हणाल्या न मागता मिळालेला हा पुरस्कारच आहे. माझ्या चांगल्या कामाचे बक्षीस व आणखी चांगल्या कामास प्रेरणा साहेबांनी दिली. साहेबांना मनःपूर्वक धन्यवाद.यावेळी माझ्या सहकारी शिक्षिका सौ.शितोळे व सौ.आव्हाड उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments