Advertisement

सुशिलकुमार पावरा यांना ८ राष्ट्रीय पक्षांची टिकीट ऑफर ; वेट अ‍ॅण्ड वाॅचची भूमिका

अपक्ष लढा,पक्ष नको:बिरसा फायटर्स

शहादा : नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्यानंतर महाविकास आघाडीकडून दिल्ली येथे उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.महाविकास आघाडीकडून उमेदवारीचा अंतिम निर्णय येणे बाकी आहे.सुशिलकुमार पावरा यांना ५० पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे.यात बिरसा फायटर्सचे जोयदा,चूलवड, गणोर इत्यादी २६ ग्रामपंचायत व जय आदिवासी युवा शक्ती (जयस),महाराष्ट्र ट्रायबल आघाडी,लाल भावटा ट्रायबल युनियन महाराष्ट्र प्रदेश, राजपूत्र एकलव्य भिल निषाद राष्ट्रीय एकता मंच, सातपुडा बचाओ आंदोलन,भील प्रदेश मोर्चा,एकलव्य संघटना शहादा,पावरा समाज संघ महाराष्ट्र,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, आदिवासी शिक्षक संघटना ,महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना ,सातपुडा पावरा समाज सेवा संघ, ऑल इंडिया काॅन्फडेरेशन ऑफ एसटी एससी ऑर्गनायझेशन,अखिल भारतीय आदिवासी पावरा समाज मण्डल,महाराष्ट्र राज्य अपंग कामगार संघटना,महिला बचत गट शहादा,कालिका माता ट्स्ट धडगांव, भिलवंश ग्रूप शहादा,शाळा व्यवस्थापन समिती खेरवा व वडगांव, नाभिक सेना,सुतगिरणी युनियन,इत्यादी एकूण ५० संस्था,संघटना व समितींचा समावेश आहे.आपल्याला कोणत्याही पक्षाची तिकीट मिळाली नाही तरी आपण स्वतंत्र व अपक्ष लढण्यास तयार आहोत.या ५० संघटनांचा पाठिंबा शेवटपर्यंत राहिल्यास आपण अपक्ष उमेदवार म्हणूनही ही निवडणूक जिंकू शकतो,असा विश्वास व लढण्याची भूमिका सुशिलकुमार पावरा यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना एकूण ८ पक्षांची तिकीट ऑफर करण्यात आली आहे.या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सुशिलकुमार पावरा यांना आपल्या स्वत: च्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सुशिलकुमार पावरा यांनी आपल्या बिरसा फाइटर्स पदाधिकाऱ्यांना कळवत या छोट्या पक्षांची तिकीट ऑफर वेट अ‍ॅण्ड वाॅच भूमिकेत ठेवली आहे. सर,आपण कोणत्याही पक्षाची तिकीट घ्यायची नाही,पक्षातर्फे नको,अपक्ष निवडणूक लढवा,असे बिरसा फायटर्स संघटनेचे पदाधिकाऱ्यांकडून सुचविण्यात आले आहे.
              सुशिलकुमार पावरा हे ५०० पेक्षा अधिक वेळा उपोषण करणारे भारतातले पहिले व्यक्ती आहेत.मराठी,इंग्लिश, हिंदी या भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे.बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेचे एकूण ३५६ पेक्षा अधिक शाखा आहेत. २ लाखापेक्षा अधिक सभासद संख्या आहे.२६ लोकनियुक्त सरपंच असून ग्रामपंचायतींवर सत्ता आहे.सामाजिक कामांत नेहमीच अग्रेसर असणारे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय आहेत. नंदूरबार लोकसभा मतदारसंघात तुमचे मत कोणाचे? म्हणून ट्रा पोलवर जनतेने आपल्या पसंतीनुसार सुशिलकुमार पावरा यांना विजयी केले आहे.सध्यस्थितीत नंदूरबार लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेची पहिली पसंती सुशिलकुमार पावरा हेच आहेत.अपक्ष उमेदवार म्हणूनही सुशिलकुमार पावरा हेच निवडणूक १००% जिंकतील.असा विश्वास बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments