Advertisement

दिल्लीत सुशिलकुमार पावरांच्या नावाची चर्चा

शहादा : महाविकास आघाडीकडून नंदूरबार लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना द्यावी,आमचा त्यांना पाठिंबा आहे,अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्याकडे ५० पेक्षा अधिक संघटनांनी केली आहे. दिनांक १९ मार्चला अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालय दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींची सभा झाली.त्यात नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या नावाची चर्चा झाली आहे.काँग्रेस पक्ष कार्यालयात सुशिलकुमार पावरा यांचे नंदूरबार लोकसभाश्रॆत्रासाठी नामांकन दाखल करण्यात आले आहे.
या नामांकनातसुशिलकुमार पावरा हे ५०० पेक्षा अधिक वेळा उपोषण करणारे भारतातले पहिले व्यक्ती आहेत.lnternational idol,राष्ट्रीय कलामित्र, राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, शिक्षक, कवी,लेखक, पत्रकार गायक,नृत्यक, कराटेपटू,उपोषणकर्ता, समाजसेवक अशी चांगली ओळख सुशिलकुमार पावरा यांची जनमानसात आहे. मराठी,इंग्लिश, हिंदी या भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे.
                बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेचे एकूण ३५६ पेक्षा अधिक शाखा आहेत. २ लाखापेक्षा अधिक सभासद संख्या आहे.२६ लोकनियुक्त सरपंच असून ग्रामपंचायतींवर सत्ता आहे.सामाजिक कामांत नेहमीच अग्रेसर असणारे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय आहेत.सध्यस्थितीत नंदूरबार लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेची पहिली पसंती सुशिलकुमार पावरा हेच आहेत. आमचा सुशिलकुमार पावरा यांना जाहीर पाठिंबा आहे.त्यांना उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीचा उमेदवारी हा १००% जिंकेल. असा आम्हाला विश्वास आहे.म्हणून महाविकास आघाडीकडून नंदूरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनाच उमेदवारी द्यावी,अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments