Advertisement

साक्री तालुक्याची बिरसा फायटर्सची नवीन टिम जाहीर

तालुकाध्यक्ष पदी गोपाळ कुवर तर उपाध्यक्ष शेरद पवार यांची निवड

शहादा: बिरसा फायटर्स ही आदिवासी समाजाची सामाजिक संघटना आहे. बिरसा फायटर्सच्या एकूण ३५६ शाखा झाल्या आहेत.२ लाखांपेक्षा अधिक सभासद संख्या झाली आहे.संघटनेच्या शाखा दिवसेंदिवस वाढतच आहेत. साक्री तालुक्यातील बिरसा फायटर्सची जुनी टिम बदलून नवीन चेह-यांची निवड करण्यात आली आहे.तालुकाध्यक्ष पदी गोपाळ कुवर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी शेरद पवार यांची निवड करण्यात आली असून सचिव पदी रोहित गायकवाड यांची वर्णी लागली आहे. विशेषत हे सगळे नव तरूण असल्यामुळे बिरसा फायटर्स साक्री टीममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुशिलकुमार पावरा यांच्या कामांना प्रभावित होऊन आमची बिरसा फाइटर्स मध्ये काम करण्याची इच्छा निर्माण झाली,अशी प्रतिक्रिया राकेश बागूल यांनी दिली आहे.बिरसा फायटर्स साक्री तालुक्याची टिम बनवण्यासाठी साक्री येथे सभा घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
             नवनिर्वाचित बिरसा फायटर्स तालुका शाखा साक्री टिमचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,उपाध्यक्ष सुरेश पंधरे,राज्याध्यक्ष मनोज पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,महासचिव राजेंद्र पाडवी ,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी,नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments