Advertisement

संविधान बदलणा-यांनाच बदला- सुशिलकुमार पावरा

भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांचा बिरसा फायटर्सने केला जाहीर निषेध

शहादा: ४०० सीटे संविधान बदलने के लिए और धर्म की रक्षा के लिए चाहिए, असे वक्तव्य करणा-या भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचा बिरसा फायटर्स संघटनेने जाहीर निषेध व्यक्त केला आहे.निवेदन लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डै, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,वडगाव अध्यक्ष राहूल चव्हाण, करण सुळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि २६ जानेवारी १९५० रोजी आपली राज्यघटना अंमलात आली.याच राज्यघटनेनूसार आपले केंद्र सरकार, राज्य सरकार, एकुणच राज्यव्यवस्था चालते. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली.स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समता,बंधूत्वाची शिकवण संविधान देते.परंतु कर्नाटकचे भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी भाजप के ४०० सीटे आने पर संविधान बदल देंगे और धर्म की सत्ता शुरू करेंगे, असे बेताल वक्तव्य केले आहे.त्यांच्या वक्तव्याचा आम्ही बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो. अनंतकुमार हेगडे यांच्या अशा भडकावू वक्तव्याने देशातील संपूर्ण जनतेच्या भावना दुखावल्या असून लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.म्हणून अनंतकुमार हेगडे यांनी लोकांची जाहीर माफी मागावी.संविधान बदलण्याची भाषा करणा-या अनंतकुमार हेगडे यांना खासदार पदावरून काढून टाकण्यात यावे.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून देशभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments