Advertisement

बिरसा फायटर्स जनसंपर्क कार्यालयाचे शहादा येथे शानदार उद्घाटन

 शहादा: दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रभूदत्तनगर ता.शहादा जिल्हा नंदूरबार येथे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या मातोश्री सौ.थावलीबाई पावरा यांच्या शुभहस्ते बिरसा फायटर्स जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी, सोमनाथ पावरा,करन सुळे, धडगांवचे बिरसा फायटर्सचे लक्ष्मण पावरा,अर्जून पावरा,दिलीप पावरा,सौ.वनिता पावरा,सौ.थावलीबाई पावरा,सौ.लक्ष्मीबाई रावताळे,सौ.वनिता पावरा,प्रभूदत्तनगर गाव शाखेचे सचिव राजेंद्र पावरा,करन पाडवी,कौशल जयस्वाल, कु.राधिका पावरा,कु.निकिता पावरा,प्रतिक्षा वळवी,सुरक्षा वळवी,अंजली चित्रकथे, गंगा पावरा,किरण पावरा,ज्ञानेश्वर पावरा,हॅरी पावरा,परी पावरा,नील रावताळे आदि ५० पेक्षा कार्यकर्ते उपस्थित होते.
           बिरसा फायटर्स संघटनेकडे जनतेचे येणारे विषय दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक लोक संघटनेकडे लेखी व तोंडी स्वरूपात प्रश्न पाठवित आहेत.ही बाब लक्षात घेऊन लोकांची कामे करून देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. जनतेनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी बिरसा फायटर्सचा संपर्क क्रमांक / वाॅटसप नंबर 9665006464 यावर विषय / प्रश्न/ समस्या लेखी अथवा तोंडी कळवावी,त्याचे निराकरण करण्याचे काम बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात येतील, असे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments