Advertisement

आदिवासी मुलीचा खून करणा-यांना फाशी द्या: बिरसा फायटर्सची मागणी

पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांना निवेदन

शहादा: धुळे जिल्ह्य़ातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणा-यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदूरबार संघटनेकडून पोलीस अधीक्षक धुळे व पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांच्याकडे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,गोपाल भंडारी,सोमनाथ पावरा,महेश प्रधान,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                   धुळे जिल्ह्य़ातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून खुन केल्याची घटना घडली आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.मुलीचा खून झाल्याची घटना दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी रविवारी उघडकीस आली आहे.तीन दिवस उलटून गेले तरी आरोपींना अटक करण्यात आली नाही.मुलीचा मृतदेह एका शेतात गोणपाटात आढळून आला.सोमवारी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.ही एक गंभीर बाब आहे.तरी सदर घटनेतील आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्यात यावी व सदर प्रकरणाचा जलद न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने पोलीस प्रशासनास केली आहे.

Post a Comment

0 Comments