Advertisement

ग्रामपंचायत गणोर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये 55 महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी CBC,थायरॉईड, सिकल सेल , तपासणी यांसारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. ‘महिलांचे आरोग्य कायम निरोगी व सुदृढ राहावे, यासाठी आमच्याकडून कायम प्रयत्न सुरु असतात. त्याचाच एक भाग म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कम्युनिटी हेल्थ ऑफिसर dr. पूजा शिरसाट यांनी दिली . ह्या वेळी सरपंच शितल रावताळे, ग्रा सदस्य राहुल रावताळे चंद्रकांत शेल्टे आरोग्य सेवक संदीप राठोड, नर्स अनिता मालुसरे व गावातील महिला आदी उपस्थित होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वीणा शेल्टे, वसंती निकुम ममता वळवी गुणवंता भामरे, आदींचे मोलाचे सहकार्य लाभले .

Post a Comment

0 Comments