Advertisement

वडगाव जि.प.उच्च प्राथमिक शाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने साजरा करण्यात आला

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगांव ता. शहादा जि. नंदुरबार येथे 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. प्रकाश नावडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन उत्कृष्ट रितीने सादर केले नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास पं.स. सदस्य श्री. प्रकाश नावडे माझी पं.स. सदस्य श्री. रणसिंग पटले, लगन पावरा, सरपंच ज्योतीताई पावरा, उपसरपंच राजपाल सोनवणे, पोलिस पाटील छोटुलाल नावडे, शा.व्य. समिती अध्यक्ष व सदस्य ग्रामस्थ बिरसा फायटर्स चे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जालिंदर पावरा,सामाजिक कार्यकर्ता दिनेश पावरा, राहुल चव्हाण, पवन सुळे, बिरबल पावरा, तसेच माजी सैनिक अखिराज पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन पावरा, ग्रामसेवक मंडले आप्पा, तलाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, कार्यक्रमास उपस्थित होते.
      सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.अशोक पावरा, सायसिंग पावरा, बलदेव पवार, दिपक ढोले, छोटुलाल महाजन, जगन वसावे, संगिता निकम मॅडम, भाईदास वळवी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments