Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी छेडले आझाद मैदान मुंबई येथे ५१२ वे उपोषण !


नंदुरबार जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; मुख्यमंत्र्यांना एक हजार पेक्षा अधिक निवेदन

नंदुरबार प्रतिनिधी: दिनांक:२४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान मुंबई येथे सुशिलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपले ५१२ वे उपोषण छेडले आहे. नंदुरबार जिल्हा तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलिस ठाणे नंदुरबारचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार जहांगीर पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा.सुशिलकुमार पावरा यांच्या वडिलांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपीं श्रवण दत्त, आशित कांबळे, हेमंत पाटील, हेमंतकुमार पाटील व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वर गुन्हे दाखल करून अटक करा .नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशा -यावर व सुपारी घेऊन सुडबद्धीने, भ्रष्ट पद्धतीने अवैध, बेकायदेशीर, अप्रमाणिकपणे आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरूपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणा-या भ्रष्ट,अकार्यक्षम, आदिवासी विरोधी, गुंड प्रवृत्तीच्या पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांना बडतर्फ करा.९ सामाजिक कार्यकर्त्यांवरचा हद्दपारीचा आदेश रद्द करा .
                       महिलेवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे असणा-या वादग्रस्त पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील शहादा यांना पदावरून हटवा व माझ्या राहत्या घरात मी नसताना विना वर्दीत रात्री बेरात्री १० पेक्षा अधिक पोलिसांना घरात घूसवून आदिवासी महिला व मुलांना त्रास द्यायला लावणारा वादग्रस्त पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील व संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा .आदिवासी तक्रारदाराची तक्रार नाकारुन आरोपींना वाचवण्यासाठी तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या व आदिवासी महिलांची तक्रार नाकारणा-या सुशिलकुमार पावरा यांच्या वर बाईचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या वादग्रस्त जातीयवादी तत्कालीन पोलिस निरीक्षक शहादा निलेश देसले यांच्या वर कायदेशीर कारवाई करून सेवेतून निलंबित करा.मागील ३ वर्षात एकाही प्रकरणात आदिवासींना न्याय न‌ देणा-या , सर्वच केसेस मॅनेज होऊन दाबून टाकणाऱ्या तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्या वर कायदेशीर कारवाई करून सेवेतून निलंबित करा. तक्रारदाराकडूनच ४३ हजार रुपये लाच घेणाऱ्या धडगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील व ठाणे अंमलदार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा. नंदुरबार जिल्ह्यातील अवैध धंदे व‌ व्यवसाय बंद करा. आदिवासी बांधवांवर व सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करणे बंद करा. मयत व्यक्तीवर एकूण ४३ कलमे लावून खोटे गुन्हे दाखल केल्याबद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा.अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments