Advertisement

६० वनदावे मंजूर; बिरसा फायटर्सच्या आंदोलनाला यश!

 IAS अंजली शर्मा यांनी बिरसा फायटर्सच्या भेटीनंतर दावे केले तात्काळ मंजूर!
आदिवासींच्या नावे होणार जमीन;प्रलंबित दावेही मंजूर होण्याच्या मार्गावर!

शहादा: जुलै २०२२ पासून आजतागायत प्रलंबित असणारे ६० दावे बिरसा फायटर्सच्या २० डिसेंबर २०२३ रोजीच्या ठिय्या आंदोलनानंतर व पाठपुराव्यानंतर मंजूर करण्यात आले आहेत. या वनदाव्याबाबत पाठपुराव्यासाठी बिरसा फायटर्स संघटनेने दिनांक २९ जानेवारी २०२४ रोजी IAS उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट घेतली व १५ मिनिटे चर्चा केली. हे वनदावे तात्काळ मंजूर करत असल्याचे सांगितले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,वडगाव गाव अध्यक्ष राहूल चव्हाण, आकाश तडवी,सोमनाथ सुळे,दिवान पावरा,दिलीप वसावे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                  जिल्ह्यासह शहादा तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वनदावे तात्काळ मंजूर करून निकाली काढावीत;यासाठी बिरसा फायटर्ससह प्रलंबित वनदावेदारांनी शहादा विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.काही गावनिहाय प्रलंबित वनदावे वडगांव ३४४,चांदसैली १३१, दूधखेडा ५८, लंगडी १७९,सटीपाणी ३००,मानमोळ्या ७७, नवानगर ४०,भोंगरा २५ व मलगाव येथील संबंधित कार्यालयाकडून हरवलेले १४९ असे एकूण १३०३ प्रलंबित वनदावे मंजूर करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली.अधिकारी आंदोलन स्थळी येऊन आपल्या मागणीनुसार विभागीय वन हक्क समितीची बैठक घेऊन लवकरच वनदावे निकाली काढू;व बैठकीवेळी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.अखेर ६० वनदावे मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे बिरसा फायटर्सच्या ठिय्या आंदोलनाला यश मिळाले आहे.आदिवासी वनहक्क धारकाच्या नावे जमीन होणार आहे,म्हणून वनहक्क धारक आनंदी झाले आहेत.उर्वरित दावे सुद्धा मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत.

Post a Comment

0 Comments