Advertisement

राणीकाजल ऑटो पार्टस व गॅरेजचे खेतिया येथे शानदार उद्घाटन

*आदिवासी तरूणांनी व्यवसाय क्षेत्रात उतरावे: सुशिलकुमार पावरा*

 शहादा: दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी राणीकाजल ऑटो पार्टस व गॅरेज खेडदिगर खेतिया दुकानाचे उद्घाटन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक मा. करण तडवी, सामाजिक कार्यकर्ते तथा सहाय्यक कृषी अधिकारी मा.सुनिल सुळे,डाॅ.योगेश पवार, पत्रकार मा. जगन ठाकरे,बिरसा फायटर्स जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जलिंदर पावरा व पावरा समाजाचे बांधव तसेच अन्य बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            पावरा समाजाचे व्यक्ती ऑटो पार्टस व गॅरेज अशा व्यवसाय क्षेत्रात जाऊन प्रगती करत आहेत, ही आमच्या पावरा समाजासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे.आजच्या तरूणांनी शिक्षण घेऊन नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसाय क्षेत्रात प्रगती करावी.या दुकानात येऊन आदिवासी बांधवांनी तसेच समस्त ग्राहकांनी ऑटो साहित्य खरेदी करावे व आपली बिघडलेली गाडी दुरूस्त करवून घ्यावे. असे आम्ही आवाहन करतो.दुकानाचे मालक श्री.संतोष वळवी व श्री. कैलास तडवी यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत सुशिलकुमार पावरा व त्यांच्या सहका-यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments