Advertisement

आदिवासींसाठी शुन्य जागा,बिरसा फायटर्स आक्रमक!

*रयत शिक्षण संस्थेच्या जाहीरातीवर शंका?*

 शहादा: अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शुन्य जागा असलेली रयत शिक्षण संस्था साताराची शिक्षण सेवक भरतीची जाहिरात तात्काळ रद्द करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व सचिव विकास देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे देण्यात आले.निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,उपाध्यक्ष गणेश खर्डे,वडगाव गाव अध्यक्ष राहूल चव्हाण, सोमनाथ सुळे,आकाश तडवी,दिवान पावरा,दिलीप वसावे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                    निवेदनात म्हटले आहे की ,रयत शिक्षण संस्था,सातारा द्वारे दिनांक २६/०१/२०२४ रोजी शिक्षण सेवक भरतीसाठी जाहीरात काढण्यात आलेली आहे.या जाहिरातीत प्रवर्गानूसार एकूण ८१४ रिक्त पदे आहेत. सगळ्या प्रवर्गासाठी रिक्त जागा दाखवण्यात आलेल्या आहेत, परंतु अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शून्य जागा दाखवण्यात आलेली आहे.त्यामुळे या जाहीरातीवर शंका निर्माण होत आहे. अनुसूचित जमातीसाठी एकही जागा नसणे ही आदिवासी समाजाच्या उमेदवारांवर अन्याय करणारी बाब आहे.त्याचा सविस्तर खुलासा रयत शिक्षण संस्थेने जनतेसमोर करणे आवश्यक आहे.
             आदिवासींचे ७% आरक्षण हे संविधानिक असून ते प्रत्येक भरतीच्या जाहीरातीवर असणे व त्यानूसार भरती होणे आवश्यक आहे.आदिवासी समाजाला ख-या अर्थाने ७% आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही.कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची,बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे.खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रांआधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या हजारो नोक-या हडप केल्या आहेत.७जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून,राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर,असंवैधानिक सेवासंरक्षण देण्याचा येत आहे.आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे.म्हणून आदिवासी उमेदवारांवर अन्याय करणारी रयत शिक्षण संस्था साताराची दिनांक २६/०१/२०२४ रोजीची जाहीरातीवर तात्काळ रद्द करण्यात यावी.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments