Advertisement

लोकमान्य ज्येष्ट नागरिक मंडळ शहादा ची मासिक सभा संपन्न

शहादा:लोकमान्य ज्येष्ट नागरिक मंडळ शहादा ची मासिक सभा दिनांक १४/०१/२०२४ रविवार रोजी सकाळी नवू वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री रामजी विठ्ठल पाटील यांचे अध्यक्षतेखाली मंडऴाचे ज्येष्ठ सदस्य श्री शिवदासभाई पाटील यांचे मोटर गॅरेजच्या शेडखाली शहादा येथे घेण्यात आली. सभेला सुरुवात करण्यापूर्वी फेस्कॉमच्या नियमाप्रमाणे पूज्य साने गुरुजी यांची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हणण्यात आली. नंतर श्रध्दांजली देण्यात आली.व सभेला सुरुवात झाली. सचिव श्री गजानन विसपुते यांनी सभेत मागील सभा प्रोसेडिंग वाचन,जमा खर्च वाचन केले . सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तसेच सभासदांच्या अडीअडचणी व त्यावरील ऊपाय यावर चर्चा करण्यात आली. तसेच मंडऴाचे ऊपाध्यक्ष ॲड. श्री गोविंद भाई पाटील यांचेवर नुकतीच शश्रक्रिया होवून ते सुखरुप परतले, त्यांना गुलाबपुष्प देवून शुभेच्छा देण्यात आल्या.त्याचप्रमाणे अध्यक्षांनी मनोगत व्यक्त करतांना सुचना केली की ,एखाद्या संघटनेने किंवा व्यक्तिने राजकारणविरहीत विधायक काम, धार्मिक काम करण्यासाठी जर आपल्या ज्येष्ट नागरिक मंडलाचा पाठिंबा किंवा सल्ला मागितला तर तो द्यावा असे मत मांडले, त्यावर उपस्थित सभासदांनी राजकारणविरहीत विधायक कामासाठीच्या विषयावर पाठिंबा द्यावा असे सुचविले.सभेस संस्थापक अध्यक्ष श्री शिवदासभाई पाटील, फेस्कॉमचे संचालक श्री के. डी. गिरासे मंडऴाचे कार्यकारिणी सदस्य,मंडळाचे सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.शेवटी अल्पोपहार होवून सभेची सांगता झाली. सभेचे सुत्रसंचलन व आभार सचिव श्री गजानन विसपुते यांनी केले.

Post a Comment

0 Comments