Advertisement

खरगोन येथे महिलांचे HB कॅम्प घेण्यात आले

आज दि. ६/१२/२०२३ रोजी खरगोन येथे महिलांचे HB कॅम्प घेण्यात आला त्यात ८३ महिलांचे व किशोरवयीन मुलींचे थायरॉईट, सिकलसेल CBC चेक करण्यात आले.
ह्या वेळी विद्या मॅडम, प्रकाश चव्हाण सर, ctc विना शेल्टे, icrp छायाताई,तडवी,रंजना पवार,सरपंच अनिल रावताळे,उप सरपंच दिनेश निकुम,सदस्य रवींद्र पवार डॉ. पूजा मॅडम, आरोग्य सेवक राठोड सर आरोग्य विभागातील कर्मचारी गटातील महिला व ग्रामस्थ ह्या वेळी उपस्थित होते 
तसेच डॉक्टरांनी सांगितले की घरातील महिला कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळत असते. कुटुंबासाठी झिजताना तिचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण, शहरी, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या सर्व महिलांची स्थिती साधारण हीच असते. तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची चिंता करण्यासाठीच राज्यातील मातांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. राज्यातील शेवटच्या महिलेची आरोग्य तपासणी होईपर्यंत हे अभियान सुरू राहील.

Post a Comment

0 Comments