Advertisement

वनदावे मंजूरीसाठी बिरसा फायटर्सचे ठिय्या आंदोलन; लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित!


शहादा:जिल्ह्यासह शहादा तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वनदावे तात्काळ मंजूर करून निकाली काढावीत;यासाठी बिरसा फायटर्ससह प्रलंबित वनदावेदारांनी शहादा विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.काही गावनिहाय प्रलंबित वनदावे वडगांव ३४४,चांदसैली १३१, दूधखेडा ५८, लंगडी १७९,सटीपाणी ३००,मानमोळ्या ७७, नवानगर ४०,भोंगरा २५ व मलगाव येथील संबंधित कार्यालयाकडून हरवलेले १४९ असे एकूण १३०३ प्रलंबित वनदावे मंजूर करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली.अधिकारी आंदोलन स्थळी येऊन आपल्या मागणीनुसार विभागीय वन हक्क समितीची बैठक घेऊन लवकरच वनदावे निकाली काढू;व बैठकीवेळी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा व गोपाल भंडारी,सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित वनदावेदारांना मार्गदर्शन केले.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धप्रमुख जालिंदर पावरा,वडगांव शाखाध्यक्ष राहुल चव्हाण,कार्याध्यक्ष बिरबल पावरा,माजी सरपंच रमेश पावरा,राजेश वळवी,करण सुळे,सुनील ठाकरे,राजल ठाकरे व मोठ्या संख्येने प्रलंबित वनदावेदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments