Advertisement

सुतगिरणी कामगार न्यायालयात दाद मागणार!


सुतगिरणी बंद;कामगारांवर उपासमारीची वेळ

शहादा:सुतगिरणी मॅनेजमेंटने सुतगिरणी बंद करून आमच्यावर अन्याय केला आहे,आमच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.ग्रॅज्युएटी,पि.एफ. आणि बॅन्क हफ्ते ,पतपेढीचे हफ्ते कपात केलेले ते मिळावेत, कंपनी बंद पासूनचा पगार मिळावा, कामगारांचा जो कामाचा कालावधी बाकी आहे त्याचा फरक मिळावा,कामगार कायद्यानुसार सवलती मिळाव्यात, अशा विविध मागण्यांसाठी शहादा सुतगिरणी कामगार युनियन आता कामगार न्यायालयात दाद मागणार आहे,अशी प्रतिक्रिया सुतगारणी कामगार युनियनचे अध्यक्ष जगन निकुंभ यांनी दिली.यावेळी उपाध्यक्ष रामदास पाटील, दिलीप सोनवणे सह कामगार उपस्थित होते.
               आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक २२ ऑगस्ट २०२३ पासून सुतगिरणीतील कामगारांनी १० दिवस बेमुदत संप केला होता.पीएफ मिळावा,मागील व या वर्षीचा बोनस मिळावा,पगार वेळेवर मिळावा,इंडेक्स नंबर लावण्यात यावा,ग्रॅज्युएटी मिळावी,दवाखाना सुरू करावा,कॅन्टीन सुरू करावे,महीलांना रात्रीची १२ ते ८ ची ड्यूटी देऊ नका,पतपेढीत व बॅकेत कर्जाचे हप्ते पोहचवा,वर्षाला २५ रजा द्या,पिण्याच्या पाण्याची सोय करा,रिटायर्ड कामगारांना पेन्शन द्या,सुतगिरणीचे झाडे तोडून विकू नका,सुतगिरणीचे सामान भंगारच्या भावाने विकू नका,शेतक-यांचे कापसाचे पैसे द्या,कामगारांचे पैसे द्या इत्यादी मागण्यांसाठी हा संप सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा गेटसमोर सुरू केला होता.
             सुतगिरणीचे एमडी राजाराम पाटील यांच्याकडेच आमचे पैसे आहेत.ते आमच्या मागण्यांबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.आमच्या मागण्यांकडे कुणीतरी लक्ष देईल व आमच्या समस्या सोडवेल,या आशेवर आम्ही या संपावर बसून आहोत, अशी व्यथा कामगारांनी मांडली होती.अभी नही तो कभी नही,हम अपना हक मांगते नही किसीसे भिख मांगते,कामगार युनियन जिंदाबाद,हमारी मांगे पूरी करो, कोण म्हणतो देणार नाही,घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशा जोरदार घोषणा कामगारांनी दिल्या.

Post a Comment

0 Comments