Advertisement

वेळवी येथे १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा जयंती उत्सव

दापोली: १५ नोव्हेंबरला आदिवासी क्रांतीकारक बिरसा मुंडा जयंतीनिमित्ताने वेळवी येथे बिरसा मुंडा जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आदिवासी विकास विभागीय कमिटी कांगवई, वेळवी कलानगर,भोंमडी,विरसई,सुकोंडी व समस्त गावातील आदिवासी बांधवांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाची सुरवात सकाळी ११ वाजता होणार असून दुपारी ३ वाजता महिलांचा हळदी कुंकू समारंभ व रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
                     कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी अध्यक्ष शांताराम जाधव व निवृत्त नायब तहसीलदार गोपीनाथ चौधरी यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष इंटरनॅशनल आयडॉल तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा हे आहेत.सामाजिक कार्यकर्ते चंदू कोकतरे हे समाजप्रबोधन करणार आहेत. प्रमुख अतिथीत अर्चना तांबे तहसीलदार दापोली,सुनील खरात गटविकास अधिकारी दापोली,विवेक अहिरे पोलीस निरीक्षक दापोली,काळूराम वाघमारे पंचायत समिती सदस्य, अशोक पवार उपाध्यक्ष, आशा जाधव महिला अध्यक्षा,रंजित दळवी सरपंच वेळवी,धोंडू चौगुले तंटामुक्त अध्यक्ष, मधूकर दळवी सामाजिक कार्यकर्ते,प्रकाश मोरे बीट हवालदार, मदन खामकर मुख्याध्यापक आश्रमशाळा वेरळ, चव्हाण सर मुख्याध्यापक आश्रमशाळा कादवण यांना निमंत्रित करण्यात आले आहेत.
                   आयोजक आदिवासी विकास विभाग कमिटीत माल्या जाधव, रमेश पवार, रवींद्र वाघमारे,रामजी वाघमारे,सहदेव वाघमारे,सुरेश वाघमारे,गजानन पवार, दामोदर पवार, बाळाराम पवार, भरत मुकणे,मधूकर वाघमारे,सदानंद वाघमारे,बबन वाघमारे,रेश्मा वाघमारे,निर्मला जाधव, अशोक पवार आदिंचा समावेश आहे.दरवर्षी आदिवासी बांधवांकडून बिरसा मुंडा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Post a Comment

0 Comments