Advertisement

शिक्षकांना वेठीस धरण्याऐवजी विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीकडे शिक्षणाधिका-यांनी लक्ष देण्याची गरज: सुशिलकुमार पावरा


बिरसा फायटर्सने केला भ्रष्टाचाराचा भांडाफोड;शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

हिंगोणीपाडा शाळेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा: गटशिक्षणाधिका-यांकडे निवेद्नाद्वारे मागणी

शिरपूर: पूज्य साने गुरूजी माध्यमिक विद्यालय हिंगोणीपाडा येथील विद्यार्थ्यांना सन २०१५ पासून २०२३ पर्यंत शिष्यवृत्ती दिली जात नसल्याची तक्रार शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी बिरसा फायटर्स संघटनेकडे केली होती.त्या आधारे बिरसा फायटर्स संघटनेने शिरपूरचे गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती.गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विस्तार अधिका-यांची चौकशी समिती नेमून याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ३० लाख रुपयांपेक्षा अधिक भ्रष्टाचार झाल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे.विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी संगनमताने विद्यार्थ्यांच्या खोट्या सह्या व एकाच व्यक्तीचे अंगठे मारून हडप केल्याचे चौकशीत समोर आले आहे.
             दिनांक ४ सप्टेंबर रोजी माध्यमिक विद्यालय हिंगोणीपाडा येथील शाळेला बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. शाळेत १२ पैकी फक्त ५ शिक्षक कर्मचारी हजर होते व ७ गैरहजर होते.२६१ पैकी फक्त ३३ विद्यार्थी हजर तर तब्बल २२८ विद्यार्थी गैरहजर असल्याचे आढळून आले.५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांकडे पुस्तके, वहया,पेन अथवा कुठलेच शैक्षणिक साहित्य नव्हते. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना मराठी शब्द वाचता,लिहिता व बोलता येत नाही.
                     शाळेतील भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेने गटशिक्षणाधिकारी सुरवाडकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा,धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे,तालुका सचिव गेंद्या पावरा,पदाधिकारी साहेबराव पावरा सह काही कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्य़ाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रामाणिक व कर्तव्यदक्ष शिक्षकांना वेठीस धरण्याऐवजी हिंगोणीपाड्यासारख्या शाळेत लक्ष घालून कामचुकार शिक्षकांवर कारवाई करून विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम केले पाहिजे.सध्या काही संस्थाचालकांचा कागदोपत्री शाळा चालवून फक्त पैसा कमावणे हा धंदाच बनला आहे.हा काळा धंदा बंद झाला पाहिजे,अशी संतप्त प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments