Advertisement

जिल्हा परिषद शाळा सावर्डे येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

पालघर :सौरभ कामडी
आज मोखड्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावर्डे येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रक्षाबंधन कार्येक्रम आयोजित केला होता. सावर्डे शाळेचे मुख्यद्यापक श्री संतोष बोंद्रे सर हे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृति क कार्यक्रम प्रत्येक वर्षी राबवत असून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांना आपली भारतीय संस्कृतीची ओळख, रक्षाबंधनाचा महत्व इतिहास सांगून माहिती देत असतात या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आनंददाई,उत्साही वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली जाते.त्यात काही मुलांना बहीण नसल्याने रक्षाबंधनाचा अनुभव घेता येत नाही शाळेत हा उपक्रम राबवल्याने विद्यार्थ्यांना एक बहिण भावाच् अनोखं नातं तयार होत. तसेच संतोष बोंद्रे सर यांना स्वयंपाकि सीताबाई झोले यांनी राखी बांधून रक्षाबंधन केले. यावेळी सानप सर यांना सुद्धा राखी बांधण्यात आली रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला.

Post a Comment

0 Comments