Advertisement

थोडी खुशी,थोडा गम!१८ महिन्यांचा पीएफ बाकी!

सुतगिरणी कामगारांचा संप मागे!सुतगिरणी चालू!
शहादा:आपल्या विविध मागण्यांसाठी दिनांक २२ ऑगस्ट २०२३ पासून सुतगिरणीतील कामगारांनी सुरू केलेला बेमुदत संप अखेर दहाव्या दिवशीही मागे घेण्यात आला आहे.पीएफ मिळावा,मागील व या वर्षीचा बोनस मिळावा,पगार वेळेवर मिळावा,इंडेक्स नंबर लावण्यात यावा,ग्रॅज्युएटी मिळावी,दवाखाना सुरू करावा,कॅन्टीन सुरू करावे,महीलांना रात्रीची १२ ते ८ ची ड्यूटी देऊ नका,पतपेढीत व बॅकेत कर्जाचे हप्ते पोहचवा,वर्षाला २५ रजा द्या,पिण्याच्या पाण्याची सोय करा,रिटायर्ड कामगारांना पेन्शन द्या,सुतगिरणीचे झाडे तोडून विकू नका,सुतगिरणीचे सामान भंगारच्या भावाने विकू नका,शेतक-यांचे कापसाचे पैसे द्या,कामगारांचे पैसे द्या इत्यादी मागण्यांसाठी हा संप सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा गेटसमोर सुरू होता.अखेर दहाव्या दिवशी संप मागे घेण्यात आला व सुतगिरणी पूर्ववत चालू करण्यात आली आहे.आपल्या काही मागण्या मान्य झाल्या म्हणून काही कामगार खूश आहेत,तर अजूनही १८ महिन्यांचा पीएफ देण्यात आला नाही.त्यामुळे थोडी खूशी थोडा गम! असे स्थिती कामगारांत निर्माण झाली आहे.
            चालु वर्षाचा ५ महिन्यांचा पीएफ भरला, माहे ऑगस्ट पासून इंडेक्स नंबर लावणार, माहे सप्टेंबर पासून एक पगारी रजा लावणार, बदली कामगारांना कायम स्केल लावणार, सन २०२१ ते २०२२ व चालू वर्षाचा बोनस दिनांक ८ ते ९ नोव्हेंबर रोजी देणार, कामगारांना प्रत्येक महिन्याचा पगार ५ ते ६ तारखेला देणार, माहे ऑगस्ट पासून प्रत्येक महिन्याचा पीएफ १५ ते १७ तारखेला भरणार, मागील वर्षीचा बोनस चेक दिनांक ३० ऑगस्ट ला दिला आहे. अशा एकूण ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहे.म्हणून आम्ही हा बेमुदत संप मागे घेतला आहे.या संपामध्ये सगळेच कामगार एकजुटीने सहभागी झाले व आपल्या मागण्यांबाबत बोलले.यापुढे सुतगिरणी प्रशासन संपात बोलणा-या कुठल्याही कामगारांवर दबाव टाकेल,कामावरून काढून टाकण्याचा प्रयत्न करेल किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा प्रयत्न करेल,तर कामगारांच्या पाठीशी आमची युनियन भक्कमपणे उभी राहील,अशी माहिती सुतगिरणी कामगार युनियनचे सदस्य दिलीप सोनवणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments