Advertisement

मनिपुर येथील २ आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या:- आदिवासी संघटनांची मागणी

ब्रेकिंग न्यूज शिरपूर:- मणिपूर राज्यात जी काही घटना घडाली आहे ती समस्त मानव जातीला काळिमा फासणारी अशी घटना आहे या घटनेला सुपर्ण देशातुन आक्रोश, विरोध होत आहे या घटनेच्या निषेधार्थ आज प्रांत अधिकारी ऑफिस शिरपूर येथे समस्त आदिवासी समाज बांधवातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मणिपूर राज्यांचा जो 2 महिन्या आधिचा विडियो व्हायरल झाला आहे त्यात हजारोंच्या संख्येने मैतई समाजाच्या नराधमांनी 2 कुकी आदिवासी महिलेंवर त्यांचे सामुहिक बलात्कार करून त्या महिलांना बंदुकीच्या धाकाने निवस्त्र करून त्यांची दिंडी काढलेली आहे आणि त्यांच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना देखील गोळ्या झाडून मारण्यात आले आहे‌ असा निंदनीय प्रकार या भारत देशातील मणिपूर राज्यात घडला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होतांच संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे व निषेध करण्यात येत आहे. मणिपूर राज्यात मैतई समाज बहुसंख्य असल्याने व मुख्यमंत्री मैतई समाजचा असल्याने कुकी आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे व आरोपींना पाठीशी घालत आहे अशा निर्लज्ज भाजप मुख्यमंत्री बीरन सिहचा व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर निषेध करण्यात आला व मुजोर राज्यसरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करण्यात आली आहे व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा संपूर्ण देशातून आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, व रावण ग्रुप महाराष्ट्र राज्य तसेच समस्त आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे...

Post a Comment

0 Comments