Advertisement

वडगाव ग्रामपंचायत येथे लवकरात लवकर कॉंक्रिटीकरण करण्यात यावे:-अशी मागणी गाव शाखा बिरसा फायटर्स व ग्रामस्थांनी केली

सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत सदस्य यांना निवेदन 

 वडगाव:-ग्रामपंचायत वडगाव येथे श्री.लगन दुलबा पावरा यांच्या घरापासून ते सौ.चिनकी गिरधर पावरा यांच्या घरापर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे-असी मागणी गाव शाखा बिरसा फायटर्स व ग्रामस्थांनी ग्रामसेवक एस.व्ही.मंडळे व सरपंच दिनेश पावरा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे,

            निवेदनात म्हटले आहे की वडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतं आहेत. ग्रामपंचायत वडगाव तर्फे शासनाच्या विविध योजनेतून वडगावला सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यात आले आहेत.परंतु श्री.लगन दुलबा पावरा यांच्या घरापासून ते सौ.चिनकी गिरधर पावरा यांच्या घरापर्यंत रस्ता अद्याप बनविण्यात आला नाही.त्यामुळे आम्हाला दळणवळण करण्यास अनेक अडचणी येत आहेत. शिवाय सांडपाण्याची व्यवस्था न केल्यामुळे पाणी साचून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे आम्हा रहिवाशांना सदर रस्त्यावरून येता जातांना आम्हा रहिवाशांना खूपच त्रास होत आहे.
सदर रस्ता लवकरात लवकरात झाल्यास आम्हा रहिवाशांना व पादचा-यांना पायी येण्या जाण्याची,चार चाकी,दुचाकी वाहनाने येण्या जाण्याची सोय होईल व इतर अनेक अडचणी दूर होतील, म्हणून ग्रामपंचायत तर्फे लवकरात लवकर रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करून तयार करण्यात यावे अशी मागणी गाव शाखा बिरसा फायटर्स व ग्रामस्थ यांनी केली आहे उपस्थित जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जलिंदर पावरा,गाव शाखा उपाध्यक्ष राजू पावरा,गाव शाखा संपर्क प्रमुख बिरबल पावरा,गाव शाखा सल्लागार पवन पावरा, सदस्य राहुल पावरा, रमेश पावरा, विजय सोनवणे होते 

Post a Comment

0 Comments