Advertisement

महिला सक्षमीकरणासाठी पुरूषी ताकदीशिवाय माविमने उद्योग निर्माण केला- सुरेशकुमार पंधरे.

तालुकास्तरिय सुरेशकुमार पंधरे यांना सन २०२३ सुधारक संम्मान पुरस्कार संम्मानित 

सुधारक सन्मान पुरस्कार २०२३ तालुकासबला लोकसंचालित केंद्र साकोली कडून संम्मानित 

महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी पुरूषांचा लोकसहभाग गरजेचा 
साकोली ( २ जून)
 महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासनअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ सन २०२३चा सुधारक संम्मान सोहळा तहसिलसभागृह साकोली येथे संपन्न झाला यावेळी सुरेश कुमार पंधरें यांस तालुकास्तरिय सुधारक संम्मान पुरस्कार बि.डी. अो.के.डी.टेंभरे साहेब यांचे हस्ते स्मॄर्तीचिन्ह देवून संम्मानित केले. याप्रसंगी ना त.गावंडे,काकोडकर सर माविम,भंडारा,गजभिये, कोरचे,सुपर वायजर हजर होत्या माविम गटा च्या अध्यक्ष सचिव मंचावर होत्या याप्रसंगी संम्मान सोहळ्याप्रसंगी सुधारक पुरस्कार प्राप्त सुरेशकुमार पंधरे यांनी संबोधित करतांनी "पुरूषी संम्मान हा महिला कडून दिला जात असेल तर जगात महिलांचा स्थान किती मोठा आहे हे ३१ मे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने दिसून आला कारण माविमने विविध अळी अळचणी सोडवून आपले स्तरावरून कुटुंब,गाव,ता. जिल्हा कसा चालवावा असे धडे बचत गटातून दिले.जर पुरूषी वर्चष्व व सहभाग असेल महिला सबलीकरणाला विकासाची जोड व उर्जा मिळेल.पुरूषांसह महिलां ना अन्यायाविरूध्द लढण्याची ताकद मिळेल.महाराष्ट्र शासना तर्फे यावर्षीच्या सन २०२३ च्या सुधारक संम्मान पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवतांनी अतिशय चांगला पायंडा पाडून गावोगावात
महिलांमध्ये एकीची भावना वाढी स लागून दारू,सारखे अनंतवाईट धंदे बंद करून व्यसन मुक्त समाज निर्माण करून हे पुरस्कॄत सुधारक महिलांना सत्तेची खरी रणरागीणी करतील तर पुरस्कार पाञ पुरूष खरेच सुधारक या बिरूदास संम्मानस पाञ ठरतील व गावांचा नाव लौकिक होईल. पंचायत राज मध्ये अनेक महिला वर्गाचा सत्तास्थानी सहभाग असतो त्यात महिलांना स्वतंञ स्थान मिळवून देण्यात मर्यादा पुरूषोत्तमांचा सहभाग गरजेचा असतो तेव्हा आमचे सारखे सुधारक उत्तम कार्य पाडण्यास पूढे येण्याची शपथ घ्यावी वाईट रूढी परंपराना मुठमाती देवून सक्षम समाजसेवकांच्या विचारा तून मातोश्री जीजाऊ, दुर्गावति साविञीदेवी फुले,अहिल्यादेवी होळकराचे पाञ व त्यांचे विचार जीवनात सर्वानी आत्मसात करा तरच त्यांचे नावे पुरूषांना दिलेला पुरस्कार योग्य आहे असे समझले जाईल व न्यायाचे होईल या वेळी सुरेशकुमार पंधरे यांनी मंचका वरून आपले मत प्रगट केले यावेळी पुरस्कार सोहळ्याला २२ ग्राम पंचायत मधून १,१ उत्कॄष्ठ पुरूषांचा संम्मान सोहळा पार पडला.यात संचालन गजभिये तर समारोप प्रणिता गडपाले यांनी केले .

Post a Comment

0 Comments