Advertisement

आदिवासी पारधी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

आदिवासी पारधी समाज शिरपूरच्या वतीने शिरपूर तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आदिवासी पारधी समाज सभागृह,शिरपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचा मेडल, प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता दहावी व इयत्ता बारावी नंतर काय करायचे? आपले करिअर कोणत्या क्षेत्रात घडवायचे? करियर घडवत असताना येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेल्या शैक्षणिक योजना कोणत्या? याविषयी श्रीराम सोनवणे, सौ. सोनवणे मॅडम, गणेश साळुंके उदयसिंग साळुंके व दिगंबर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना दाभाडे व प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा दाभाडे हे उपस्थित होते. 
  कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमोल पवार, निलेश पारधी, आकाश पारधी, अभिषेक पवार, कैलास पवार व प्रवीण पारधी यांनी मेहनत घेतली व सफलतापूर्वक कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमासाठी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments