Advertisement

ट्रायबल फोरम च्या धडगाव तालुकाध्यक्ष पदी संजय पराडके यांची नियुक्ती

नंदुरबार :- आदिवासी समाजाच्या ,सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असलेले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गौऱ्या येथील संजय पराडके यांची ट्रायबल फोरम धडगांव तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.संजय पराडके हे ट्रायबल मंच लाईव्ह न्यूज चे मुख्य संपादक तथा मुख्य प्रचार प्रमुख धडगाव तालुका - माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व सायं दैनिक ज्योतिर्गमय या वृत्तपत्राचे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. नेहमीच समाजसेवा करण्यासाठी उत्सुक असणारे अशे व्यक्ती आहे. पराडके यांची ट्रायबल फोरम च्या धडगाव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.ही नियुक्ती ट्रायबल फोरम संस्थापक प्रमोद घोडाम यांच्या मार्गदर्शना खाली नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे.ट्रायबल फोरम हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी,अस्तित्व,अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी 'ट्रायबल फोरम' या कँडरबेस शिस्तबद्ध, वैचारिक असलेल्या फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे.वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या संघटनामध्ये नियुक्ती झाल्यामुळे धडगांव तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments