Advertisement

दिनांक 8 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे

जळगाव : प्रतिनिधी  दि.21/05/2023

जळगाव : राजयोग शोध आणि प्रतिष्ठानाच्या मीडिया प्रभागातर्फे दि. 8 ते 12 सप्टेंबर, 2023 रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू, राजस्थान येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक शांती आणि सदभावनेसाठी माध्यमांद्वारे सशक्तिकरण या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात क्षेत्र, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदितील प्रतिनिधींचा यात सहभाग असेल.

*📋सहभाग कसा नोंदवाल:*

     संमेलनात सहभागासाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांच्याशी 9850693705 या व्हॉटसएप्प भ्रमणध्वनीवर किंवा bksomnath@gmail.com या ईमेल वर संपर्क साधून नोंदणी करु शकतात.

*🏖️नैसर्गिक सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू:*

       अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे प्रमुख शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. आबू येथे सुंदर पर्वतराई, तलाव, धबधबे, बगीचे आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना म्हणून देलवाडा, अचलगढ, गुरुशिखर, आबू अंबाजी देवी, पीस पार्क, ज्ञानसरोवार, पांडवभवन, शांतीवन, विशाल ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध आध्यात्मिक , नैसर्गीक पर्यटन स्थळ सुद्धा आहेत. 10 जून ही नोंदणीची अंतिम तारीख आहे.

Post a Comment

0 Comments