Advertisement

हॅरी पावरा' सायकलिंग स्पर्धेत प्रथम

"जुडवा भाई" मुवाज व मुसा द्वितीय व तृतीय

दापोली:वर्ल्ड हेल्थ डे निमित्ताने
दापोली येथील सरस्वती विद्यामंदिर जालगांव तर्फे सायकलिंग रॅली आयोजित करण्यात आली होती.यात सायकलिंग स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत सातवीतील हॅरी पावरा याने प्रथम क्रमांक पटकावला. तर सातवीतील जुडवा भाई मुवाज गिलगिले द्वितीय क्रमांक व मुसा गिलगिले यांनी तृतीय क्रमांक पटकावला.शाळेत सातवीतीलच विद्यार्थांचे क्रमांक आल्यामुळे विशेष कौतुक केले जात आहे.          
 स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या प्रिन्सिपल सारिका गुजराती यांनी केले.यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल सारिका गुजराती, विश्वजीत तांबे पी आर ओ, क्रीडा शिक्षक कितीराज नाचरे,क्रिडा शिक्षिका ऋशाली कडू इत्यादी शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धेत सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
विजेत्यांचे शाळेच्या प्रिन्सिपल यांनी कौतुक केले.क्रीडा शिक्षक कितीराज नाचरे व ऋशाली कडू यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.विजेत्या स्पर्धकांचे त्यांच्या मित्रांनी अभिनंदन केले.ही रॅली आरोग्याबाबत लोकांत जनजागृती व्हावी, म्हणून घेण्यात आली.
           हॅरी पावरा हा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांचा मुलगा आहे.आदिवासी बांधवांकडूनही हॅरी पावराचे वाॅटसप ग्रुपवर व फेसबुक अशा सोशल मिडीयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments