Advertisement

बिरसा फायटर्सच्या राज्य उपाध्यक्ष पदी गणेश खर्डे यांची निवड

दापोली: बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 मार्च रोजी झालेल्या झूम मिटींग मध्ये गणेश खर्डे यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.गणेश खर्डे हे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष पदावर कार्यरत होते.एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.त्यांचे सामाजिक कार्य बघून सभेत उपस्थित कृष्णा भंडारी व इतर कार्यकर्त्यांनी उपाध्यक्ष पदासाठी गणेश खर्डे यांचे नाव सुचवले.त्यानंतर महासचिव राजेंद्र पाडवी यांनी अनुमोदन दिले.गणेश खर्डे यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड करत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी जाहीर केले.राज्य अध्यक्ष मनोज पावरा यांनी गणेश खर्डे यांचे प्रथम अभिनंदन केले.त्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी गणेश खर्डे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                  राजेश धुर्वे हे याआधी राज्य उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.आपली तब्येत बरी नसल्याकारणाने व आपण अनफीट असल्याकारणाने या पदावर काम करण्यास अडचण निर्माण होईल. म्हणून सक्रीय कार्यकर्त्यास या उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात यावी अशी इच्छा राजेश धुर्वे यांनी इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार उपाध्यक्ष पदावरती गणेश खर्डे यांची निवड करण्यात आली.
          मनोज पावरा राज्याध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव, दादाजी बागुल महानिरीक्षक, विलास पावरा नाशिक विभाग अध्यक्ष, कृष्णा भंडारी पुणे जिल्हाध्यक्ष, विजय सहारे नाशिक कार्याध्यक्ष, सुभाष पावरा तळोदा तालुकाध्यक्ष, जालिंदर पावरा नंदुरबार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, 
संतोष वळवी आदी पदाधिकारी सभेत उपस्थित होते.माझ्यावर वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी मी चांगल्या प्रकारे पार पाडीन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश खर्डे यांनी दिली.गणेश खर्डे यांची बिरसा फायटर्सच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व मित्रांनी अभिनंदन केले व गणेश खर्डे यांनीही मित्रांचे आभार मानले.गणेश खर्डे यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून अभिनंदनाचे वर्षांत होत आहे.

Post a Comment

0 Comments